नांदगाव , ग्रामपंचायत ही रायगड जिल्हा परिषद, मुरुड पंचायत समिती अंतर्गत येणारी एक ग्रामिण स्वराज्य संस्था आहे. गावाची लोकसंख्या ४३४४ असून महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात वसलेले एक महत्त्वपूर्ण गाव आहे. हे गाव नांदगाव ग्रामपंचायतीचे मुख्यालय आहे, ज्यामध्ये नांदगावसह दांडे तर्फे नांदगाव, आडी पांगाळे, आणि सरणे या गावांचा समावेश आहे. रायगड जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव समुद्र किनाऱ्यालगत वसलेले आहे.
नांदगाव , तालुका मुरुड, जिल्हा रायगड नांदगाव हे गाव महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील एक गाव आहे. हे जिल्हा मुख्यालय अलिबाग पासून सुमारे ४० किमी अंतरावर आणि तालुका मुख्यालय मुरुड पासून सुमारे १० किमी अंतरावर आहे. प्रशासकीय दृष्ट्या नांदगाव हे स्वतःचे ग्रामपंचायत केंद्र आहे. पोस्टल सेवा: नांदगाव गावाचा पिन कोड ४०२४०१ आहे. या गावासाठीची पोस्टल सेवा नांदगाव पोस्ट ऑफिस द्वारे पुरवली जाते. जवळची गावे: या गावाच्या आसपासची काही महत्त्वाची गावे काशीद ( kashid ), कोर्लई (korlai), सालाव (salav), मजगाव (mazgaon), विहूर (Vihur) जवळची मोठी शहरे: नांदगाव गावापासून मुरुड , अलिबाग , रोहा आणि श्रीवर्धन ही मोठी शहरे जवळ आहेत.
मुरुड पोलीस ठाणे मुरुड जंजिरा जि रायगड, मुरुड पोलीस स्टेशन हे नांदगाव ग्रामपंचायत पासून ९ किलोमीटरवर आहे.
सरपंच
9028284031
उपसरपंच
8956446861
ग्रामपंचायत अधिकारी
9049147502
कुटुंबांची संख्या
लोकसंख्या
पुरुष
महिला
नांदगाव ग्रामपंचायत द्वारे पुरवल्या जाणाऱ्या उत्कृष्ट सुविधा
आरोग्य उपकेंद्र आहे जिथे प्राथमिक आरोग्य सेवा पुरवली जाते. येथे नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण मोहीम आणि आरोग्य शिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात.
"हर घर जल हर घर नल " अन्वये कुटुंबाना स्वतंत्र नळ कनेक्शन देण्यात आले तसेच गावामध्ये ४ आर. ओ. फिल्टर बसविले आहेत तसेच ATM सुविधा आहे.
हवामान विषयक माहिती गावात मोबाईलवर उपलब्ध होते.
1. प्राथमिक शाळा : 1 ते 4 जिल्हा परिषद मराठी शाळा संख्या - ३, १ ते ७ जिल्हा परिषद मराठी शाळा संख्या - १, १ ते ७ जिल्हा परिषद उर्दू शाळा संख्या - १ तसेच नर्सिंग स्कूल - नूतन नर्सिंग महाविद्यालय
अंगणवाडी केंद्र - ६ आहेत परंतु ४ अंगणवाडी इमारती आहेत
दूरध्वनी सुविधा इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.
गावात सामाजिक सभामंडप ५ असून येथे सार्वजनिक कार्यक्रम विवाहसोहळा होतात.
स्मशानभुमी शेड, दशक्रिया विधी शेड उपलब्ध आहे.
गावात जागोजागी CCTV बसविले असुन त्याचा निगराणीत आहे, ज्यामुळे गावातील सुरक्षिततेत मोठी वाढ झाली आहे.
गावात २ स्वतंत्र व्यायामशाळा इमारत उपलब्ध आहेत.
स्वतंत्र अभ्यासिका इमारत उपलब्ध नाही परंतु अभ्यासिका इमारत प्रस्तावित आहे
गावात क्रिकेट व इतर खेळण्यासाठी स्वतंत्र मैदान उपलब्ध आहे
गावात एक स्वतंत्र आपले सरकार सेवा केंद्र आहे त्या द्वारे ऑनलाईन दाखले व ऑनलाईन सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे सेंटर आहे
मुरुड पोलीस ठाणे मुरुड जंजिरा जि रायगड, मुरुड पोलीस स्टेशन हे नांदगाव ग्रामपंचायत पासून ९ किलोमीटरवर आहे.
महाराष्ट्र शासन आणि ग्रामीण विकास विभाग
माननीय मुख्यमंत्री
Hon'ble Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय उपमुख्यमंत्री
Hon'ble Deputy Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय उपमुख्यमंत्री
Hon'ble Deputy Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय मंत्री
Hon'ble Minister
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
माननीय राज्यमंत्री
Hon'ble Minister of State
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
प्रमुख सचिव
Principal Secretary
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी
District Collector & Magistrate
रायगड जिल्हा
अतिरिक्त जिल्हाधिकारी
Additional District Collector
रायगड जिल्हा
मुख्य कार्यकारी अधिकारी
Chief Executive Officer
जिल्हा परिषद, रायगड
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
Deputy Chief Executive Officer
जिल्हा परिषद, रायगड
ब्लॉक विकास अधिकारी
Block Development Officer
मुरुड तालुका